Archive | April 2010

6. तिची स्वप्ने – २


वाघ नष्ट होताहेत.
झपाट्यानं घसरते आहे त्यांची संख्या
आणि हे निश्चितच काळजीचं कारण आहे.
नुसती चर्चा फिजूल आहे आता. काही
कृती केली नाही, तर दिसणार नाही
वाघाचं नामोनिशाणही
कुठल्याच जंगलात.
फक्त झू मध्ये दाखवावा लागेल वाघ मुलांना.
जंगलं नष्ट होताहेत
हे ही एक कारण आहे वाघ नष्ट होण्याचं
माणसांना हवे आहेत रस्ते, धरणं, कारखाने,
आणि अर्थातच घरं, शाळा,
थिएटर्ससुद्धा.
हवी आहे त्यासाठी मोकळी जमीन
जिच्यावर जंगलांनी अतिक्रमण केलंय
शतकानुशतकं
आणि अर्थातच वाघांनीही.
वाघनख गळ्यात घातलं की शक्तिमान होतो पुरुष
प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी;
वाघाच्या सुळ्याचा ताईत दंडावर बांधताच
संरक्षण करू शकतो आपल्या मालमत्तेचं
मालमत्तेत स्त्रियाही आल्याच!
त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे
वाघाच्या मांसाचं सूप प्यायलं की
पौरुष्य वाढतं पुरुषाचं.
नाहीच जमलं यातलं काही तरीही निदान
व्याघ्राजीन तर नक्कीच उपयोगी पडतं
ध्यानधारणेला बसण्यासाठी.
तिला कळत नाही महत्त्व या गोष्टीचं
तिला स्वप्नात दिसतात शेकडो वाघ
चपळ, झेपावणारे, भेदक नजरेचे.
आणि  एखादा मनभावन
शांत दमदार चालीने चालणारा
जंगलातला पाचोळा तुडवत जाणारा
पट्ट्यापट्ट्यांचा वाघ, ज्यावर
तिला स्वार व्हावंसं वाटतं
निदान स्वप्नात तरी
तिला वाटत राहते काळजी, की
वाघ नष्ट होताहेत…
आता दुर्गादेवी कोणत्या वाहनावरून येईल
राक्षसांचा वध करण्यासाठी?
                  ०००

( छायाचित्र : श्री. अरविंद तेलकर यांच्याकडून साभार )

६. / ७. चिन्ह : निवडक आणि वार्षिक…!


निवडक चिन्ह

संपादक : सतीश नाईक

‘निवडक चिन्ह’च्या प्रकाशन समारंभात बोलण्यासाठी श्री. सतीश नाईक यांचा फोन आला, तेव्हा एरवी प्रकाशन समारंभांचे वावडे असलेली मी एका मिनिटाचाही विचार न करता ‘हो’ म्हणाले. प्रत्यक्षात नेमका त्यावेळी मलेरिया झाल्याने जाता आले नाही, पण चिन्ह विषयी सविस्तर लिहून ती खंत दूर करेन, असं मी स्वतःला सांगितलं आणि नाईकांना देखील.
खिशात पैसे नसल्याची जी पुस्तकं वा मासिकं पाहून विकत घेता येत नाहीत, याची खंत वाटू शकते, त्यात चिन्हचे अंक कायम असत! पण पुस्तके केव्हाही घेता येतात, त्या पद्धतीने नंतर केव्हातरी कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात ते अंक मिळूनही जात. मासिकाचा आकार असला तरी त्याचं संग्रहमूल्य कायम पुस्तकाचंच ( आणि तेही आवडतं पुस्तक आणि संदर्भपुस्तक अशा दुहेरी फायद्याचं ) असतं, हे कधीच लक्षात आलं होतं. अशावेळी ‘निवडक चिन्ह’ ही तर पर्वणीच ठरली. उत्तम कागद, आकर्षक मांडणी, अर्थातच भरपूर रेखाटने आणि चित्रे… आणि त्याविषयीचे शब्द!
दैनंदिन जीवनात सर्वत्र भरपूर रंग वापरत असणारी, अनेक आकारांबाबत कळत-नकळत सजग असणारी, सुंदराची ओढ असणारी सरसगट माणसं या कलेपासून दूरावत का आणि कशी गेली? आपण अनुभवांच्या एका मोठ्या अदभुत विश्वाला मुकतोय, याची जाणीवच कशी मोडीत निघाली? असे अनेक प्रश्न मनात असतात. कलेच्या ‘बाजारा’त अमुक लाखांना चित्रं विकल्या गेल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत येतात, पण चित्रकलाविषयक लेखन जवळपास नसतेच. पूर्वी काही वृत्तपत्रांत निदान मुंबईतल्या कलादालनांमधून भरणार्‍या चित्रप्रदर्शनांविषयी परिचय-परीक्षणवजा काही थोडातरी मजकूर असायचा. चार चित्रकारांची नावं कानी पडायची आणि चार चित्रं छापलेली बघायला मिळायची. हे सारं वाचकांच्या नकळत बेमालुमपणे अदृश्य होऊन गेलं. महाराष्ट्रात इतकी कलामहाविद्यालये आहेत आणि इतके नामवंत चित्रकार-शिल्पकार महाराष्ट्राने जगाला दिले आहेत; पण एकूण चित्रकला या विषयावरची पुस्तके मराठीत अगदी बोटावर मोजण्याइतकी आहेत. ललित साहित्यात तर ‘राजा रविवर्मा’ ही सुमार कादंबरी वगळता नाहीच काही. या सार्‍या पार्श्वभूमीवर ‘चिन्ह’च्या सतीश नाईकांनी चिन्ह प्रकाशित करण्यापासून ते चित्रकलाविषयक डॉक्युमेंटेशन करणे, चित्रकारांच्या कार्यशाळा घेणे असे अनेक उपक्रम राबवले, ते निश्चितच फार महत्त्वाचे ठरले आहेत.
पर्व पहिले : १९८७-८९ हा निवडक चिन्ह चा मासिकाच्या आकाराच्याच तब्बल २९६ पानांचा जाडजूड ग्रंथ हाती आला, तेव्हा आधी भुरळ घातली ती त्याच्या देखण्या निर्मितीने. सुनील कर्णिक यांची प्रस्तावना, सतीश नाईक यांचं संपादकीय आपल्याला चिन्हच्या ‘इतिहासा’त घेऊन जातात. चित्रकलेविषयीचा अंक हा अधिक ‘दिसणारा’ हवा, अशी जाणीव असली तरीदेखील सामान्य वाचकांना नजरेसमोर ठेवल्याने आधी हा अंक कलेची गोडी लावणारा निर्माण व्हावा आणि मग त्याने कलादृष्टी देण्याच्या मार्गाने विकसित व्हावं, असे संपादकांचे धोरण होते. मधली तब्बल बारा वर्षं अंक बंद पडला, मग पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यात आला आणि आता नवा आलेला अंक दिवाळी अंक म्हणून न काढता ‘वार्षिक’ म्हणून काढण्याचा निर्णय घेण्यात आला, ही सारी स्थित्यंतरे चिन्ह च्या बाबतीत घडली. त्याबाबत सतीश नाईक लिहितात,” चिन्हचा पहिला टप्पा जो अयशस्वी ठरला तो वाचकांनी वेळीच अंक विकत घेऊन वाचला नाही म्हणून नव्हे, तर आपणच कुठेतरी कमी पडलो म्हणून असावा, असा संपूर्णपणे उलटा विचार मी करू लागलो. इतका प्रचंड प्रतिसाद ‘निवडक चिन्ह’च्या घोषणेनंतर अनुभवायला मिळाला.”
या प्रतिसादाला साजेशी उत्तम निर्मिती केलेला निवडक चिन्ह वाचणे हा एका वेगळ्या जगात घेऊन जाणारा अनुभव आहे. नेहमीच्याच गोष्टींकडे वेगळ्या नजरेने, वेगळ्या विचारांनी, वेगळ्या भावनांनी पाहणार्‍या कलावंतांच्या दुनियेचा सैरसपाटा इथून सुरू होतो.
चित्रकारांच्या डायर्‍या, आत्मकथनं, मुलाखती, आठवणी, व्यक्तिचित्रं आणि लेख अशा विविध स्वरूपाचे लेखन चिन्ह मध्ये आहे. त्यातील निवडक लेखन, आता इंट्रो, पूरक नोंदी, टिपांसह आपल्याला एकत्र वाचायला मिळते आहे. त्यातली अनेक माणसे आज हयात नाहीत आणि कितीतरी गोष्टी बदलून गेल्या आहेत. त्यामुळे अंकाचे संदर्भमूल्य अधिकच जाणवते आहे.
अचला जोशी यांचे ‘पोत’राज हे हा द.ग.गोडसे यांचे व्यक्तिचित्र, अशोक शहाणे यांचा ‘शहाणे करून सोडावे’ हा लेख, चित्रकार-चित्रपटकार-नेपथ्यकार-कॅलिग्राफर-कॉपीरायटर-मॉडेल… कलेच्या किती क्षेत्रातील माणसांची आत्मकथनं, प्रभाकर बरवेंच्या डायरीतली पानं, चित्रकलेचे शिक्षण घेऊन पुढे मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत ठरलेल्या प्रमिला दंडवते, नाना पाटेकर, मोहन वाघ, मंगेश कुलकर्णी अशांच्या जे जे मधल्या आठवणी; बेंद्रे, हुसेन, ओके यांच्यासारख्यांच्या मुलाखती… लिहायचे म्हटले तर अख्खी अनुक्रमणिकाच इथे द्यावी लागेल; कारण हे सारे मुलातच ‘निवडक’ आहे. दत्तात्रय पाडेकरांचा शेवटी दिलेला चिन्हच्या मांडणीबाबतचा लेखही एक वेगळा अनुभव सांगणारा आहे. यात समाविष्ट न केले गेलेले लेख कोणते आहेत, याची उत्सुकता शेवटी जोडलेली सूची भागवू शकते.
‘निवडक चिन्ह’चं कौतुक मनातून ओसरायच्या आत हाती आला तो पूर्ण नव्या स्वरूपातला चिन्हचा २००९-१०चा ताजा वार्षिक अंक. संपूर्ण अंक आर्टपेपरवर छापलेला आणि रंगीत! संपादकांच्याच नव्हे, तर वाचकांच्याही स्वप्नातला असावा हा अंक! चिन्हची इंग्रजी आवृत्ती आणि वेबसाइट देखील लवकरच वाचकांसमोर येत असल्याच्या चांगल्या बातमीसह!
महाराष्ट्राचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुपीक कल्पना त्या निमित्ताने पुढे आली. समुद्रात तब्बल तीनशे कोटी रु. खर्चून ते उभारले जाणार आहे. या बाबत लिहिलेल्या संपादकीयात सतीश नाईक लिहितात, ” शे-दीडशे फूट लांबीच्या या विशालकाय शिल्पाचा डोळा तरी किती मोठा असेल? हे तरी ही मंडळी अनुमानाने सांगू शकतील काय? या संदर्भात एखाद्या शिल्पकाराशी तरी बोलणे झाले आहे का? हे एवढे मोठे शिल्प घडवणार तरी कोण? त्याचा सांगाडा उभारणार तरी कसा? तो एकसंध करणार की तुकड्यातुकड्यांनी करणार? ब्राँझमध्ये हे शिल्प घडवले जाणार असेल तर ते ओतण्यासाठी लागणारी तेवढ्याच तोलामोलाची फौंड्री तरी महाराष्ट्रात आहे का? का तीही सरकार आधी तयार करणार आणि मग त्यात हे भव्य शिल्प घडवले जाणार? ज्या सरकारने महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाची संपूर्णतः वाताहत केली; जे जे स्कूल ऑफ आर्टची कबरच खणली, ते सरकार हे सारे करणार? यांना कलेतला ‘क’ तरी कळतो का?”…. अशा सणसणीत नमनानंतर अंक चढत्या भाजणीत पुढे सरकत राहतो.
चिमुलकरांवरील कमलेश देवरुखकरांचा लेख जणू एखाद्या चित्रकारावरील कादंबरीसाठी केलेले कच्चे टिपण वाटावे असा. सोबत नजरेचं पारणं फेडणारी चिमुलकरांची चित्रं! जाणकारांचा जीव दुखावा, अशी चिमुलकरांची कहाणी. एकुणातच आपल्याकडे अस्सल कलावंतांना काय किंमत आहे, हे दाखवून देणारी. सोबत चिमुलकरांचा चित्रकलेविषयीचा लेख, म्हणजे दुर्मीळ दस्ताऐवज. ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी शेवट झालेल्या या चित्रकाराची अशी शोकांतिका का झाली, हा व्याकुळ करणारा प्रश्न प्रत्येक वाचकाला पडावा… कारण? ‘चिमुलकर प्रत्येकात असतात..’ ही या लेखाची सुरुवात वाचली की वेगळे कारण सांगायला लागणारच नाही.
‘बरवेंच्या सहवासात’ या विभागातले लेख ही वाचनीय. प्रभाकर कोलते यांचा ‘जय महाराष्ट्र’ आणि सतीश नाईक यांचा ‘मोजून माराव्या पैजारा!’ ही शिर्षकेच बोलकी आहेत!
संस्कृतीचा जो बाजार मांडला जातोय, या सार्‍या विपरित परिस्थितीला महाराष्ट्रातल्या कलाशिक्षणासंबंधीची नीती आणि नकारात्मक दृष्टिकोन असलेले कलाशिक्षक जबाबदार आहेत; असे स्पष्ट मत मांडत कोलते यांनी घेतलेला हा लेखाजोखा मुळातून संपूर्ण वाचून चिंतन करावे असा आहे.
पुंडलीक गावडे यांची मुलाखत वाचनीय आहेच, जोडीला त्यांचे काम ‘दिसते’ त्यामुळे गावडेही दिसायला लागतात.
सुरुवातीचाच शर्मिला फडके यांचा ‘वह कौन थी’ हा राजा रवि वर्मा यांच्या चित्रातील मॉडेल्स कोण? याबाबत शोध घेणारा लेख मात्र मला व्यक्तिशः खटकला. लेख चांगला आहे, पण मुळातच असे ‘चरित्रात्मक समीक्षा’ करणेच मला स्वतःला फार हास्यास्पद आणि अनावश्यक वाटत आले आहे. अर्थात हे माझे स्वत:चे मत झाले. ज्यांना अशा संशोधनांत रस आहे, त्यांना कदाचित हा लेख उपयुक्त वाटेल देखील.
कलावंतांच्या चित्रांच्या विक्रीसाठी रंगीत जाहिराती देण्याचा एक वेगळा आणि चांगला पायंडा या अंकापासून पाडला गेलेला आहे, हे एक या अंकातले नावीन्य.

निवडक चिन्ह ; संपादक : सतीश नाईक

मलपृष्ठावरील मजकूर :
खर्‍याखुर्‍या इंद्रधनुष्यातले रंग पाहून तुम्ही अद्यापही थरारून जाता? समुद्रकिनार्‍यावरच्या चांदणभरल्या पौर्णिमेच्या रात्री तुम्ही नि:स्तब्ध, मूक होता? अकरा इंची टीव्हीवरल्या मधुबालाच्या कृष्णधवल प्रतिमा पाहूनअवाक होणार्‍यांपैकी तुम्ही एक आहात? चांदण्या रात्री आकाशातले तारे मोजता मोजता तुम्ही हरवून जाता?सागराची गाज ऐकता ऐकता त्याच्या निळाईत हरपून जाता? गुरुदत्तचे चित्रपट अद्यापही तुम्हाला पुन्हा पुन्हापहावेसे वाटतात? सांजवेळी क्षितिजावरचं अस्ताला जाणारं सूर्यबिंब पाहून तुम्ही अस्वस्थ होता? सुंदर युवतीसमोरून गेली तर वळून पहावंसं वाटणार्‍यांपैकी तुम्ही एक आहात? ‘आर्ट स्कूलला जायचं होतं, पण नाही जमलं,’ असं तुमच्या बाबतीत घडलंय? माधुरी दीक्षितच्या सौंदर्याने हुसेनएवढे नाही, पण थोडंतरी फिदा झालेल्यांपैकीतुम्ही एक आहात? तुमची बच्चेकंपनी छान छान चित्रं काढते? तुमचा मुलगा वा मुलगी आर्टस्कूलला जाते?तुम्हाला चित्रकलेविषयी वाचायला आवडतं? तुमच्या दिवाणखान्यात एखादंतरी पेंटींग असायला हवं असं तुम्हालावाटतं? यापैकी एकाचं उत्तर जरी हो असेल तर तुम्ही ‘निवडक चिन्ह’ वाचायलाच हवा!

आवृत्ती पहिली : मे २००९, किंमत रु. ६०० /-
…………………………………………………………..
चिन्ह २००९-१० ; किंमत रु. २५०/-
…………………………………………………………..
चिन्ह प्रकाशन
११/बी/१०३ नीलम नगर, फेज २, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१.
दूरध्वनी : ९००४०३४९०३
e-mail : chinhamag@gmail.com

मेरी कुछ कविताओं का हिंदी अनुवाद


१. खरोंच

हर खरोंच
एक जैसी नही नही होती

सभी एक ही नाखून से हो
फिर भी

हर इक का अलग रंग
अलग छटा होती है
अलग होती है
हर इक की लंबाई

और हर खरोंच हम
लिख भी नही पाते.

०००

२. हर कविता

हर कविता
लिखने के बाद, छांपने से पहले
मै सोचती थी
क्या कहेंगे पिताजी इसे पढकर?
और
क्या होगी प्रतिक्रिया पती की?

मुझे खुशी है :
मेरी कोख से
जन्मा नही कोई पुत्र!

०००

३. डरती है स्त्री
( अनुवाद : निरंजन उजगरे / लिना मेहेंदले )

स्त्री डरती है
अकेली-विकेली रहने से
अंधेरे से… जगमग रोशनीसे…
डरती है
अपरिचित-सुपरिचित पडोस से

दोपहर में डोअरबेल के बजने से
रात को फोन से, पढे भी न गये टेलिग्राम से
स्त्री डरती ही : सुंदर दिखने से
पास गुजरते किसी भी पुरुष से
सास से, पती से, बेटे से
छिपकली से, तिलचट्टे से, चुहे से

स्त्री को चाहिये सुरक्षा
सहारा जैसे-तैसे टिकने के वास्ते
अपना स्त्रीत्व बरकरार रखने के रास्ते…
स्त्री बिखेर देती है स्त्रीत्व लाख मेलजोल के बिच
पर संभाले रखती है
सिंदूर से कोख तक के
छोटे-बडे अंश : क्षमताओं की दरारें भरने वाले

भय की लय में थरथराती छीजती
दुर्बल हो रही है स्त्री :
बंद करती है सारी खिडकीयां, दरवाजे, झरोखे
रोक देती है हवाओं को, बारीश को, धूप को
बंद कर लेती है संवेदनाओं के सारे छिद्र
घबराती है… डरती है स्त्री

डरती है स्त्री
बंधन को नकारते अपने मन से
उत्तेजन में आतुर होती देह से
सोचने वाले दिमाग की क्षमता से
डरती है स्त्री…
अंत तक अपने आप से डरती है.

०००

४. ऊब

एखाद दिन उब जाती है
रोजमर्रा के सिधे-साधे कामों से
तब औरत को लगता है
अपनी भी होनी थी पत्नी
थोडा आराम मिला होता
बना बनाया खाना चैन से परोसा गया होता
आज का अखबार आज ही चैन से पढा होता

सुने होते समाचार, की होती चर्चा दुनियाभर की खबरों की
राजनीति की, नयी आर्थिक प्रणाली की
तलछट के गुलामों को उन्नत करने की
शासकीय और स्वयंसेवी योजनाओं की
चिंता : बढते स्त्री-अत्याचारों के संख्या की
गर्भजल परीक्षा की, दहेज से मृत्यु की
सती की

औरत को याद आती है
कई बातें जो छूट गयी

गुलाम गुलामों को खरीद सकते है?
क्या गुलाम कभी मालिक बन सकते है?
गुलाम और मालिक इस अर्थ के शब्द
निर्माण ही नही हुए : क्या ऐसी कोई भाषा
होगी इस दुनिया में?

औरत पुछती रहती है सवाल अपने आप से
ऊब को पोंछकर सुस्ती झटकने के लिये और
घोलती रहती है चूल्हे पर रखे बर्तन की रटरट!

०००

५. अस्थायी

शुरू से ही
तुम्हारे और मेरे सारे संबंध
कॉण्डोम लगाये हुए

कुछ भी न होगा निर्माण इन संबंधों से
ना ही होगी कोई शर्मनाक बिमारी

अस्थायी विचार अस्थायी भावना
अस्थायी खुशी अस्थायी वेदना

फिर तुम्हारे वीर्य का गुब्बारा
कागज में लपेटकर
कचरे में फेंक देना

आखीर क्या होता है इस दुनिया में
स्थायी?

एक पल में आना
दुसरे पल में जाना
दो पलों के बिच की रस्सी पर
थोडा लटकते हुए जीना

अंततः आज के दौर में
सारे संबंध
कॉण्डोम लगाये हुए!

०००

5. मी जर बॉम्बस्फोटात फुटले…


मी जर बॉम्बस्फोटात फुटले
तर
शाईसारख्या निळ्या रंगाच्या फुलांचा
सडा पडेल सर्वदूर
शुभ्र देठांचे निळ्या पाकळ्यांचे
थबकलेले थेंबफासळ्यांच्या पिंज-यातून उडालेलं पाखरू
चिवचिव करत थांबेल जरासं
कपाळावर नाचानाच करत
मग उडून जाईल
कोंडलेले सगळे कोलाहल
मोकळे करून

सापडणार नाही सामान काहीच कुणाला
पाकीट तिकीट पॅनकार्ड अंगठी काही नाही

एक रंगांचं थारोळं दिसेल साचलेलं
तर समजा
तीच आहे मी!

4. मुलीची आई


एकीला दोन्ही मुलीच झाल्या
तिसर्‍यावेळी चौथ्या महिन्यात गर्भलिंगचिकित्सेत
मुलीचा गर्भ काळापांढरा स्क्रीनवर न्याहाळला
थेट रिकामी होऊन परतली ती घरी लगोलग
चौथ्यांदा दिसले नशिबाने योनीऐवजी लिंग
आणि सासूचा अत्यानंदाने हुरळलेला चेहरादुसरीला तीन मुलींच्या पाठीवर
चौथा मुलगा झाला
त्यानंतरच झालं पुन्हा रजोदर्शन
लग्न झालं तेव्हापासून पहिल्यांदाच इतक्या वर्षांत

तिसरीला मूलच होत नव्हतं किती वर्षं
सतरा वर्षांनी दिवस राहिले तेव्हा “सोनोग्राफीत
जुळं दिसतंय, अभिनंदन,” डॉक्टर म्हणाली हसून,
‘पण मुलीच आहेत दोन्ही…”
मुलींची आई म्हणून जगण्यापेक्षा वांझोटी म्हणवून घेणं
परवडल्यानं गर्भपात

चौथीला सतरावीला
आठशीवीला नऊह्जारवीला
दहालाखावीला
मुलीची आई आईची मुलगी
मुलीची आईची मुल..गी… ई…
आई… नकोच!

3. मुलं


मुलं मरतात, हरवतात, दूरावतात
पळवली जातात, पळून जातात काहीआईच्या दुखर्‍या स्तनांतून दूध पाझरत राहते
थेंब
थेंब
कितीतरी काळ
अश्रूंसारखे

स्तनांना येत राहते आठवण दुधाळ ओठांची
जावळाचा मऊ वास स्पर्श करत राहतो
दिसत राहतात इवले हातपाय पाळण्यात पडून नाचणारे
आतल्या लाथांच्या स्मरणाने आक्रसून जाते गर्भाशय

आठवत नाहीत कळा आठवत नाहीत किंकाळ्या
आठवत नाही ठणक तडतडत्या टाक्यांची
फक्त पहिला कोवळा ट्यांहा घुमत राहतो
तनामनाच्या पोकळ घुमटात फिरत पुनःपुन्हा

अनाथ होते आई मुलांशिवाय!