3. मुलं


मुलं मरतात, हरवतात, दूरावतात
पळवली जातात, पळून जातात काहीआईच्या दुखर्‍या स्तनांतून दूध पाझरत राहते
थेंब
थेंब
कितीतरी काळ
अश्रूंसारखे

स्तनांना येत राहते आठवण दुधाळ ओठांची
जावळाचा मऊ वास स्पर्श करत राहतो
दिसत राहतात इवले हातपाय पाळण्यात पडून नाचणारे
आतल्या लाथांच्या स्मरणाने आक्रसून जाते गर्भाशय

आठवत नाहीत कळा आठवत नाहीत किंकाळ्या
आठवत नाही ठणक तडतडत्या टाक्यांची
फक्त पहिला कोवळा ट्यांहा घुमत राहतो
तनामनाच्या पोकळ घुमटात फिरत पुनःपुन्हा

अनाथ होते आई मुलांशिवाय!

3 thoughts on “3. मुलं

  1. Khup apratim lihilat. Kharach aapan mmhanto mulacha janm zala to khar tar aaicha hi janm asto.
    Mulaanshivay kharach anath aste aai.

    Like

Leave a comment